कंटेंपररी नृत्य कलाकार- प्रशांत मोरे, फोटोग्राफी: तेजदिप्ती पावडे
'डीसीआयडीआर' पुणे तर्फे नुकत्याच संपन्न झालेली कंटेंपररी नृत्याची २ दिवसांची कार्यशाळा आणि त्या कार्यशाळेचा प्रशिक्षक 'प्रशांत मोरे' यांचा अनुभव हा नृत्याच्या एका नवीनच विश्वात घेऊन गेला. ह्या नृत्य शैलीची ओळख, त्यामागचा आशय, त्याचे सादरीकरण अशा प्रत्येक महत्वाच्या टप्प्यातून प्रशांतने विद्यार्थ्यांना नेले. आपल्या नृत्यक्षेत्रात अत्यंत एकनिष्ठतेने कार्यरत असलेला, नवीन विचार व नृत्य करण्याविषयी विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अशा उत्तम व सर्जनशील कंटेंपररी नृत्य कलाकार 'प्रशांत मोरे' याच्याशी 'संवाद' तर्फे संवाद साधून ह्या शैलीविषयी काही विचार पोहोचवण्याचा एक प्रयत्न मुलाखतीद्वारे........
कंटेंपररी नृत्य म्हणजे काय आणि ह्या नृत्यामागील आशय काय आहे?
माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून हे नृत्य म्हणजे अनेक नृत्य
शैलींचा प्रभाव पडलेले, एकत्रीकरण असलेले वाटते. बॅंले नृत्य,मोडेर्णडान्स यांचा
कितीतरी प्रभाव या नृत्यावर पडला आहे. त्याला काही सीमा नाहीत. त्याला काही बंधने
नाहीत. कुठलीही गोष्ट त्यात ठरलेली नाही. कुठलाही भाव हा संपूर्ण शरीरातून व्यक्त
होतो, केवळ मुखज अभिनयातून नाही. हा अत्यंत स्वाभाविकपणे (naturally) सादर होतो.
बॅंले सारख्या नृत्याला काही शास्त्र आहे, तसे ह्याला नाही. तुम्ही ह्यात इतर
नृत्याचाही समावेश करू शकता. खूप वेगवेगळे विषय तुम्ही मांडू शकता. प्रत्येक
नृत्याप्रमाणे ह्या नृत्याचेही आपले असे तंत्र आहे. ह्या नृत्याच्या सादरीकरणामागचा
आशय हा बराच वस्तुनिष्ठ आहे. प्रत्येकाचा आपला स्वतंत्र विचार आहे आणि तो
आपल्यापद्धतीने मांडतो.
तू हे नृत्य किती वर्ष शिकत आहेस? तू ह्या नृत्याकडे कसा वळलास?
मला ५-६ वर्षे झाली. मी नृत्याला सुरुवात केली तेव्हा माझ्यावर
बॉलीवूड नृत्याचा बराच प्रभाव होता. नंतर मी बरेच वेगवेगळे नृत्य प्रकारही शिकलो.
मी पुण्यात बॉलीवूड, हिपहोप, तसेच भरतनाट्यम शिकलो. कंटेंपररी पण मी इथूनच शिकायला
सुरवात केली. पण भारतात, रिअलिटी शोजमुळे ह्या नृत्याविषयी खूपच चुकीचा आणि वेगळा
दृष्टीकोन आहे. मी बंगलोरला गेलो, तिथल्या कंटेंपररी नर्तकांवर बराच युरोपिअन
कंटेंपररीचा प्रभाव होता. ते बघून मी खूप प्रभावित झालो. तेव्हा मग मी ते अत्यंत
मनापासून शिकलो आणि कालांतराने मी ह्याच नृत्यात रमलो. मी जे इतर नृत्यांचे शिक्षण
घेतले होते त्याचाही मला इथे वापर करता आला. माझ्यासाठी ही एक खूपच वेगळी आणि नवीन
सुरवात होती.
तुझ्या नृत्यातील शिक्षणाच्या प्रवासाविषयी सांगशील?
मुळात, कंटेंपररी नृत्य म्हणजे फक्त हालचाली करणे नसून त्यात काहीतरी
एक विचार आहे आणि तो विचार कसा, कशाप्रकारे पोहोचवायचा आणि कोणती हालचाल का करावी,
कशी करावी? ह्या सर्व बाबींचा विचार महत्त्वाचा ठरतो. मी सुरुवातीला बघून बघून
शिकलो. अनेक कार्यशाळाना गेलो आणि ह्या नृत्याचं अगदी संपूर्ण प्रशिक्षण
घेण्यासाठी मी बंगलोरला गेलो. मी बॅंले, कलरीपायत्तु, साल्सा ही शिकलो. डिप्लोमा
पूर्ण झाल्यावर मी २ वर्ष एका डान्स- कंपनी बरोबर अनुभवासाठी काम केले. त्यानंतर मी
भारताबाहेर शिकायला गेलो. एखादी संकल्पना नृत्यात कशी मांडायची हे मला अमस्टरडममध्ये(Amsterdam)
शिकायला मिळाले. “मूव्हमेंट आर्ट अट्टकलरी”मध्ये मी डिग्री घेतली. ज्यात ,इ
कंटेंपपरी, भरतनाट्यम, कलरीपायत्तू, योगा तसेच रचना आणि संरचना यांचे प्रशिक्षण
मिळाले.
ह्या शैलीसाठी विशिष्ट संगीत आणि वेशभूषा असते का?
नाही. संगीत आणि वेशभूषा हे दोन्ही तुमच्या संकल्पनेवर अवलंबून आहे. तसेच,
संगीत हे पाश्चिमात्यच असले पाहिजे किंवा हिंदुस्तानी असले पाहिजे असेही नाही.
‘मुखज’अभिनयाला किती महत्त्व आहे?
भारतीय शास्त्रीय नृत्यांमध्ये मुखजला खूप महत्त्व आहे. पण ह्या
नृत्याचे वैशिष्टय असे कि कोणताही भाव हा संपूर्ण शरीरातून अथवा शरीराच्या
कोणत्याही एका भागातूनही अभिव्यक्त करता येतो.
हस्त मुद्रांचा वापर होतो का?
भारतात जे कंटेंपररी नृत्य सादर होतं, त्यात इतर शैलींच्या प्रभावाने
सादरीकरण केले जाते. उदा. भरतनाट्यम आणि कलरी किंवा बॅंले जर घेतले तर त्यातील
काही हालचाली वा गीष्टींचा वापर इथे करतात. अशा काही शैलींमधल्या गोष्टी उचलून अभिव्यक्त
करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे शास्त्रीय नृत्याचा प्रभावाअंतर्गत हस्त मुद्रा
पण वापर होऊ शकतो.
रिअलिटी शोजमध्ये जे दाखवले जाते त्यात मूळ कंटेंपररी नृत्य असतं का
आणि ह्याबद्दल लोकांचा दृष्टीकोन कसा आहे?
भारतात होणारे रिअलिटी शोज हे वेस्टर्न रिअलिटी शोजचे अनुकरण करून
बनवले जातात. अमेरिकन संस्कृती आपल्याकडे अनुसरली जाते.पण, आपल्याकडे ‘नरेशन’ला फार महत्त्व आहे. आपल्याकडे
कथांचा खूप वापर होतो. किंबहुना, सर्व रिअलिटी शोजमध्ये हेच असते. कुठल्याही
अमूर्त कल्पना आपल्याकडे फार वापरल्या जात नाहीत. त्यामुळे युवा पिढीपर्यंत ह्या
नृत्यशैलीचे खरे स्वरूप पोहोचलेले नाही. रिअलिटी शोजसाठी तो फक्त व्यवसाय असतो.
आणि शो हा सामान्य लोकांसाठी असतो ज्यांना नृत्य फार माहित नाही. त्यामुळे ते
लोकांना समजावं म्हणून मनोरंजन्मक भावच त्यात खूप असतो, संकल्पना व शैली यांना
त्यानंतर प्राधान्य मिळते.
ह्या शैलीला पुण्यात कसा प्रतिसाद आहे?
पुण्यात खूप कमी आहे. लोकांना मनोरंजन हवे असते. नृत्य हा व्यवसाय
झाला आहे, पण त्यामुळे कलेत काहीच योगदान होत नाही. पण कलेशी संबंधित येणाऱ्या
प्रेक्षकांची संख्या अधिक असते. जसे कि- चित्रकार, संगीतातील कलाकार.
तू युवापिढीतील नर्तकांना काय संदेश देऊ इच्छीतोस?
तुम्हाला जर काही शिकायचं असेल, तर कोणाएकाला अनुसरु नका. तुम्ही
स्वतः शोध घ्या. अभ्यास करा. नृत्याला अनुसरण्यापेक्षा स्वतः काही गोष्टींचा अनुभव
घ्या!
- प्रशांत मोरे
- मुलाखतकार : स्वरदा.
{ विशेष आभार: तेजदिप्ती पावडे व डीसीआयडीआर }
Prashant More, a Contemporary performing artist, choreographer and dance teacher from Pune, India. He started dancing at a very early age. from 2008 he started his journey as a freelance performer. He took formal training in Bharatanatyam, Urban / street dance and contemporary dance and was involved in Hip-hop culture events, state competitions, cultural performances and dance productions. in 2012 he completed diploma in Movement art in Banglore, India. Later he started working as a repertory dancer and dance instructor. He was involved in Company's performances and productions and taught community in India and Europe. He performed in dance videos and documentaries. From 2014, he is been travelling to Europe for performances and studies to earn more knowledge in contemporary dance/art and choreography. He participated in a choreographic intensive course in Amsterdam. Experimental Physical Performative in Berlin. An interdisciplinary project in Bali, Indonesia. and Hong Kong international choreography festival.Currently, he is in the process of teaching and creating dance pieces. He is also researching on various movement languages and practicing in developing his own movement vocabulary.
Contact Prashant: prashant.kitchen@outlook.com
Some video links:
|
Comments
Post a Comment