'डान्स कनेक्ट': एक दृक-श्राव्य सोहळा
"बदलत्या काळाप्रमाणे कलेमध्येही देवाणघेवाण गरजेची असते. शात्रीय नृत्यशैलींसाठीचा आदर, लोकप्रियता आणि ती शिकण्याची आस्था भारत आणि भारताबाहेरही बघायला मिळते. नृत्य ह्या कलेचेही अनेक प्रकार आहेत, शैली आहेत ज्यात लोकनृत्यांबरोबरच कंटेंपररी, साल्सा, बॉलरूम, फ्लमेंकोसारखे विविध नृत्य प्रकार आहेत जे आपापल्या प्रांतांची, संस्कृतींची ओळख निर्माण करणारे आहेत. अशा नृत्यशैली आणि त्यांचे वर्षानुवर्षे प्रशिक्षण घेऊन ते सादर करणारे आंतरराष्ट्रीय नर्तक यांची भेट लवकरच आपल्याला प्रत्यक्षात होत आहे."
केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातीलही उत्तम कलाकार आपल्या शैलीचे सादरीकरण येथे करतील जेथे कंटेंपररी (Contemporary), लोकनृत्य (Folk Dance), टैंगो (Tango), एफ्रो (Afro) यांच्या सादरीकरणासाठी बांगलादेश आणि भारतातून पुणे, मुंबई आणि चेन्नई अशा वेगवेगळ्या प्रांतांतून नर्तक येणार आहेत.
पुण्यातील ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि डीसीआयडीआर संस्था एकत्र येऊन 'डान्स कनेक्ट: कनेक्टिंग वर्ल्ड डान्सर्स' हा नृत्य-महोत्सव घेऊन येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नृत्य शैलींशी ओळख आणि सादरीकरण प्रेक्षकांना करून देणे, ह्या कलांचा प्रत्यक्षात अनुभव घेऊन कलाकारांशी संवाद साधता यावा ह्या उद्देशांनी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि तेजदिप्ती पवाडे यांची डीसीआयडीआर संस्था एकत्र येऊन एक नवा रंगमंच घेऊन येत आहे.
* तहनून अहमदी (Tahnun Ahmedy), बांगलादेश - कंटेंपररी एकल नृत्य
* मोफसल आणि माती (Mofassal & माटी), बांगलादेश- बांगलादेशाचे लोकनृत्य
* पूजा कदम (Pooja Kadam), पुणे- स्त्रीविषयक दृष्टिकोनावर "शी" (She) नावाचे एकल कंटेंपररी नृत्य सादरीकरण.
* मिताली आणि अल्विन (Mitali & Alvyn), पुणे- टैंगो (Tango) नृत्य
* अभिषेक राठोड (Abhishek Rathod), मुंबई- 'मोक्ष' या संकल्पनेवर आधारित कंटेंपररी सांघिक नृत्य
* दिव्या जेनिटर (Divya Jeniter), चेन्नई- एफ्रो (Afro) सांघिक नृत्य.
ह्या सर्व कलाकारांचे नृत्य सादरीकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहेत.
जानेवारी २०, २०१८- नामदेव सभागृह
जानेवारी २१, २०१८- अंगणमंच, ललित कला केंद्र
वेळ: संध्याकाळी ६:३० ते ८:००
नृत्य महोत्सवाबरोबरच या कलाकारांबरोबरची कार्यशाळादेखील विद्यार्थ्यांसाठी, नर्तकांसाठी आयोजित केली गेली आहे.
सकाळी १० ते दुपारी १
२०/०१/२०१८- नामदेव सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
२१/०१/२०१८- कालाछाया कल्चरल सेंटर, सेनापती बापट रोड पुणे.
तसेच २१ जानेवारी रोजी ललित कला केंद्र येथे नृत्य संबंधित फोटोग्राफीचे प्रदर्शनही असणार आहे, "डान्स: अ फोटोग्राफर्स पर्स्पेक्टिव" ह्या संकल्पनेवर आधारित काढलेली नृत्याची छायाचित्रे बघायला मिळतील. असा हा नृत्य महोत्सव सर्वानुषगांनी दृक-श्राव्य असा सोहळा आहे, ज्यासाठी सर्वांनाच आमंत्रण आहे.
- स्वरदा ढेकणे. (ब्लॉगर)
Comments
Post a Comment