लघुचित्रातील नृत्य (Dance in Miniature paintings)
निबंध लेखन: किर्ती पाठक
संपूर्ण वैश्विक निर्मितीच एका जाणीवेचे,चैतन्याचे नृत्य आहे.…..आणि ते चैतन्य रुपी नृत्य आपण ज्ञात तसेच अज्ञात विश्वात सर्वत्र अविरत , अखंड सुरूच असते असे मानतो. मग ते ब्रह्मांडातील असंख्य ,अगणित ग्रह , नक्षत्र, तारे यांचे भ्रमण नृत्य असो , पंचमहाभूतातील मूळ तत्त्वाचे असो, निसर्गाचे असो, ऋतूंचे असो, पशुपक्षी , प्राणी यांचे जीवन नृत्य असो... किंवा आपल्या देहातील अणु रेणूं चे असो..... असे हे नृत्य अणू रेणूं पासून ते ब्रम्हांडा पर्यंत व्यापले गेले आहे. त्या जाणीवेला आपल्या भारतीय संस्कृतीत नृत्य कलेचे आद्य दैवत नटराज शिवशंकर यांना मानले आहे .भगवान शिवाचे नृत्य ;नटराजाच्या मूर्तीच्या शिल्पकृती मध्ये असो वा पेंटिंग्ज रुपात असो; पूर्णपणे एकवटले आहे. …. नटराजाची मूर्ती सौंदर्याने परिपूर्ण आहेच पण तिच्यातील गर्भितार्थ हा सूचक आहे, तात्विक आहे. उजव्या हातातील डमरु हे सर्जनाचे, नवनिर्मितीचे प्रतीक आहे, डाव्या हातातील अग्नी हा विनाश दर्शविणारा आहे, आशिर्वाद देणारा हात ईश्वर शक्तीचे अस्तित्व सांगणारा आहे, पायाकडे संकेत करणारा हात स्वकर्तृत्वाने कर्म वादाचा मार्ग दाखवणारा आहे,उजवा पाय मोहमाया अज्ञान ,दोषा रुपी राक्षसाला पायदळी तुडवून गुणांची वृद्धी करण्याचा मार्ग दाखवणारा आहे . नटराजाच्या मूर्ती सभोवार असलेले चक्र संपूर्ण सृष्टीचा लय विलय दर्शवणारे आहे.
अशीही सदाशिव असणारी , मांगल्याने परिपूर्ण असलेली शंकराची नृत्यमय आकृती ‘नटराज’, नृत्य कलेची आराध्य देवता आहे.
नृत्य ही एकमेव कला आहे ज्यामध्ये शिल्प, चित्र, नाट्य, साहित्य, आणि गायन या संपूर्ण ललितकला विविध स्तरांवर विविध तत्त्वे घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे अभिव्यक्त होतात. सर्व ललित कलांचे प्रयोजन एकच आहे ते म्हणजे आत्मविष्कार, सौंदर्य निर्मिती आणि अभिव्यक्ती. एक कलावंत आपल्या कलेद्वारे सर्वसामान्य भाषा व्यवहाराच्या मर्यादेपलीकडे असणाऱ्या खोलवरच्या भावना आणि स्थायीभाव यांना आविष्कृत, अभिव्यक्त करत असतो. कलावंताच्या मनावर दृश्य विश्वातील वस्तूंचा मानवी संस्कृतीचा, मानवी जीवन शैलीचा, निसर्गाचा,,ऐतिहासिक कथांचा विविध धर्माचा भावनात्मक परिणाम होतो. त्यांच्या अंतर्मनात भावगर्भ आकृती प्रदीप्त होते व चित्रकृती निर्मित होते. रंग, अवकाश ,आकार आणि रचना यातून एका अलौकिक अनुभूतीला स्पर्श करण्याचा प्रयत्न चित्रातून प्रतीत होतो.
तसे पाहता चित्रकला या ललित कलेत विविध शैली, विविध विषय आहेत.तंत्र रीती आणि व्यावहारीक उपयोजन यानुसार भित्तिचित्र, लघुचित्र , अलंकृत पट्ट असे प्रकार होतात. त्यातील लघु चित्राचे ( मिनिएचर पेंटिंग्ज )एक वेगळेच सौंदर्य आहे. लघु चित्रकला म्हणजेच मिनिएचर पेंटिंग. मिनिएचर शब्द लॅटिन शब्द मीनियम मधून तयार झाला आहे ज्याचा अर्थ लाल रंगाचा शिसा असा आहे. या रंगाचा उपयोग पुनर्जागरण काळात प्रदीप्त झालेल्या पांडू लिपीत केल्या जायचा. लघु चित्राचा अर्थ आकाराने लहान चित्र मात्र सर्वांगाने परिपूर्ण असते. यामध्ये पूर्ण चित्राचा विचार केला जातो, जसे की प्रत्येक भागाचे तपशीलवार चित्रण त्यातील छोटे-छोटे बारकावे रेखाटले जातात. ओझरत्या दृष्टिक्षेपात मोहक सौंदर्य दिसते तर जवळून निरीक्षण केले तर अभूतपूर्व अनंत गुंतागुंतीच्या भावनांचा उलगडा होतो. अत्यंत नाजूक कलाकौशल्य, आकर्षक गडद रंग, मोहक प्रतिमा, बारकाईने करण्यात आलेले कुठल्याही विषयाचे प्रगटीकरण हे लघु चित्राचे वैशिष्ट्य आहे. इतक्या आधुनिक काळात पण अजूनही खारीच्या केसांचा पेंट ब्रश म्हणून वापर केला जातो. लघु चित्रकलेचे सादरीकरण हे पाम लिफ, संगमरवरी, कागद ,लाकुड, हस्तिदंत पॅनल्स, कापड यावर विशेष करून होतो. नैसर्गिक रंगाचा जसे फुलं, पानं, वनस्पती, खनिज पदार्थ, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, सोने-चांदी यांचा वापर वापर केला जातो.
भित्तिचित्र पाठोपाठ लघुचित्रशैली चा सर्वत्र उदय झाला. सुरुवातीला लघु चित्राचा वापर बंगाल मधील पाला, बौद्ध धर्मातील ग्रंथाच्या हस्तलिखितात कथेचे विशदीकरण वा सुशोभन या हेतूने होत असे . भारतातील शैव-वैष्णव पंथाच्या प्रसाराबरोबर लघु चित्रांना विपुल विषय आणि कार्यक्षेत्र मिळाले. कृष्णभक्ती ने तर काव्य संगीत नृत्य आदी कलांबरोबरोबर लघुचित्रशैलीना बहरच आणला. भौगोलिक प्रदेश, तेथील जीवनशैली ,लोककला विषयीच्या संकल्पना घेऊन लघुचित्रशैली विकसित झाली. त्यानंतर जैन धर्मातील कलाकारांमुळे इसवीसन बाराव्या- सोळाव्या शतकात लघु चित्रकला बहरू लागली.
इसवीसन सोळाव्या- अठराव्या शतकात मोगलांच्या काळात तर लघुचित्राची विशेष भरभराट झाली. राजपूत आणि इराणी शैलीच्या संयोगाने मोगल शैली निर्माण झाली.
मोगल काळातील या लघु चित्रात राजेशाही पणा अत्यंत बारकाईने चित्रित केला आहे. चित्रात आपल्या शाही दरबारातील जनानखान्यात शाही राण्या दरबारी नृत्यकलेचा आनंद घेत असताना दिसतात सोबत वाद्यवृंद मृदंग, तानपुरा. अशी पारंपारिक वाद्य वाजवताना दिसतात. पारंपरिक पोषाखात नर्तकी कला सादर करताना अप्रतिम रित्या रेखाटण्यात आली आहे.
सतराव्या-अठराव्या शतकात राजपूत लघु चित्रकला राजस्थानात विकसित झाली. राजपूत लघु चित्रात कृष्ण जीवन चरित्राचे वर्णन आहे. कलाकार निहाल चंद यांनी अनेक लघु चित्रात कृष्ण लीलां, राधाकृष्ण यांचे निरपेक्ष प्रेम, मैत्री, गोपी भाव, राधा भावअतिशय मोहकपणे व्यक्त केला आहे. जसे राधा कृष्णाचे गोप- गोपिकां सोबतचे रास नृत्य, होळीचे होरी नृत्य... भगवान विष्णु चा नृत्यावतार असलेले नटवर कृष्ण यांच्या लीला तर लघुचित्राचा अत्यंत आवडता विषय असतो.
चित्रातील देखाव्यात तर कृष्ण हा जादुई बासरीचा स्वरनाद करताना गोपीकांनी वेढला गेला आहे आणि प्रत्येक गोपी आपल्या समीप कृष्णाला अनुभवते आहे यावरून राधेला आणि गोपिकांना कृष्णाशिवाय दुसरे जगच नाही असा अनुभव चित्रकाराने मोहक पणे वर्णिला आहे…..
लघु चित्रांची परंपरा राजस्थानच्या वेगवेगळ्या घराण्यांनी जसे बुंदी, किशनगढ, जयपुर, मारवाड येथील कलाकारांनी पुढे नेली. दख्खन मधील राग माला पेंटिंग्ज पण लघुचित्रकलेचा एक प्रकार आहे, ज्यात रागांची शृंखला असते प्रत्येक रागातली एक धून म्हणजे एक व्यक्ती ,व्यक्तीची मनस्थिती दर्शवतो. प्रेम हा राग मालाचा मूळ विषय असतो उत्कट प्रेम, आदर, मैत्री, राग-लोभ, रुसणे ,मनवणे या सर्व छटा राग मालात दिसतात .सहाही ऋतू जसे नायक-नायिकेची ज्याप्रमाणे मनस्थिती ( मूड ) दर्शवतात तसेच हे राग मालातील राग चित्रात रस निर्माण करतात…. राग मेघमाला , राग बसंत लघुचित्रात नृत्यातील पारंपारिक वाद्य जसे मृदंग पखवाज, टाळ, सतार ,वीणा, मंजीरा यांचे वर्णन दिसते.
लघु चित्रात प्रदेश विशिष्ट अशा नृत्यशैली सतत उत्क्रांत होत गेल्या विविध भारतीय अभिजात नृत्यशैली यांचा उदय झाला. भरतनाट्यम, कथकली, कथक मणिपुरी या प्रमुख नृत्यशैली मानल्या जातात. नृत्यशैलीचीकाही खास वैशिष्ट्ये, सौंदर्यस्थळे . लयबद्ध अंग संचालन तालबद्धता, सुसंबद्ध ,सुयोग्य भावाविष्कार या सर्वांना यथोचित वाद्यवृंदाची समर्पक साथ यांच्या संयोग लघु चित्रात अप्रतिमरीत्या वर्णिलेला आहे.
भारतात त्याचबरोबर लोकनृत्याची समृद्ध परंपरा असून प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असे लोक नृत्य प्रकार आहेत. विविध उत्सव, सणांच्या निमित्ताने एकत्रित होऊन आनंद व्यक्त करण्यासाठी मनोरंजनासाठी नृत्याचे सादरीकरण होत असे. प्रत्येक ऋतूतील नृत्याचे महत्व पण आगळे वेगळेच आहे जसे वसंत ऋतू, श्रावण मास.
भरतमुनींच्या नाट्य शास्त्रातील अष्टनायिका मधील अभिसारिका या नायिकेची नायका प्रतीची ओढ असो वा कलहान्तरिता नायिकेचे प्रियकरासाठी चा राग, निरपेक्ष प्रेम सर्व भावना चित्रात साकारण्याचा प्रयत्न लघु चित्रात पुरेपूर जाणवतो.
पंधराव्या शतकात पर्शियन प्रभाव आला पाम लिफ ची जागा कागदाने घेतली.
आशियायी संस्कृती इतकेच युरोपियन पाश्चिमात्य संस्कृतीचा आपण लघु चित्रावर प्रभाव जाणवतो. पर्शियन लघु चित्र कला अस्तित्वात तेराव्या शतकात आली आणि त्यावर मग चीन मोगल यांचा प्रभाव पडला. पंधराव्या- सोळाव्या शतकानंतर लघु चित्रावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. एकोणिसाव्या शतकानंतर लघु चित्रावर युरोपीयन इराणी टर्किश संस्कृतीचा पण प्रभाव दिसून येतो..
लघु चित्रात सौंदर्य साकार करण्यासाठी कलाकाराचा बारीकसारीक गोष्टींवर असलेला अभ्यास दिसून येतो.... : इराणी पर्शियन नृत्यातील पारंपारिक वाद्य जसे डफली, वायोलिन, पारंपारिक पोशाख लांब झगा विशिष्ट डोक्यावरची पिसे अडकवलेली छोटी टोपी.पर्शियन रुमाल( स्कार्फ ) म्हणजे दस्तमल मनोरंजनासाठी वापरली जाणारी माध्यमे ,असे सुंदर वर्णन चित्रकाराने केले आहे.
अर्जेंटिनाचे टॅंगो नृत्य असो की बॉलरुम नृत्य ऑस्ट्रेलियाचे वाॅल्टज नृत्य असो, रशियाचे बॅले , क्युबाचे सालसा नृत्य असो वा जापान चे काबुकी नृत्य…. प्रेमीयुगुल एकमेकांची साथ करत ,नृत्य करत असतानाचे त्यांचे संवाद, एकमेकांशी जवळीक, त्यांच्या भावना, एकमेकांमध्ये गुंतलेले ,बुडालेले असणे या सर्व भावना अतिशय मोहक रूपात आहेत.
युरोपियन लघु चित्रात छायांकन आणि दृष्टिकोन याचा परिचय होतो.
तर काबुकी नृत्यात युद्ध कथेचे वर्णन , पारंपारिक पोषाख , पारंपारिक वाद्य यांचे वर्णन दिसते.
अशाप्रकारे भारतीय शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, पाश्चिमात्य, युरोपियन ,पूर्व आशियाई येथील नृत्याच्या इतिहासात नृत्याचा विकास प्रसार होण्यासाठी लघु चित्रकला शैलीचे महत्त्वाचे योगदान आहे.
स्वानुभवाची अभिव्यक्ती कलाकार आपल्या कलेतून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.चित्रकला संवेदनाक्षम कला असून कलाकार जाणीवपूर्वक विविध भावनांच्या सूक्ष्मतम छटा व्यक्त करण्याचे सामर्थ्य या कलेत आहे. या विश्वातील कोणत्याही गोष्टीचे सौंदर्य हे त्यातील चैतन्यामुळे टिकून आहे. मानवी देहातचैतन्य जोपर्यंत आहे ते शरीर सुंदर भासते. मानवाने आपल्या स्वावभाविक चलनवलनाला आपल्या कल्पनाशक्तीची जोड देऊन ललित कलांना अनन्यसाधारण असे महत्त्व प्रदान केले आहे . या माध्यमातून त्या ईश्वर रुपी चिंतन माणसाला मोक्षाची प्रेरणा देणारा आहे.
कूर्ट झाक्स यांनी वर्ल्ड हिस्ट्री ऑफ द डान्स या ग्रंथाच्या प्रस्तावनेत नृत्य स्वरूपाविषयी महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे. ‘नृत्य कलांची जननी आहे. संगीत व काव्य या कालात्म कला होत. चित्रकला व वास्तुकला या अवकाश बद्ध होत. . नृत्य एकाच वेळी काल व अवकाश या दोन्हीत जगते. त्यात निर्माता व निर्मिती , कलावंत आणि कलाकृती या गोष्टी एकच असतात’.
त्या निर्मात्यांसाठी ही संपूर्ण सृष्टीच एक लघुचित्र आहे. अत्यंत बारकाईने या सृष्टीची निर्मिती या निर्मात्याकडून केली गेली आहे . मानवी देह, निसर्ग हे या निर्मितीचे प्रत्यक्ष रूप आहे. या निर्मात्या बद्दल ओढ आणि उत्सुकता आपल्याला कायमच असते पण एका चित्रकारांमध्ये ती सौंदर्यदृष्टी, निरीक्षण क्षमता आणि भावना अभिव्यक्त करण्याची क्षमता नक्कीच असते आणि म्हणूनच तिथे निर्माता आणि निर्मिती एक होऊन जाते.
गतिशील जगातील सर्व बदलणाऱ्या अवस्था आणि प्रवृत्ती यां पलीकडे जाऊन अविनाशी परमोच्च आनंद, गुणवत्ता आणि सामर्थ्य नृत्य आणि चित्रकला या संयोगात असते.
Essay written by: Kirti Pathak
(1st winner of NrutyaShabda Dance Essay Writing Competition, 2020 Senior Group, Organized by Samvaad Performing Arts Blog - Swarada Dhekane & Loud Applause Dance E-Magazine - Neha Muthiyan)
नृत्यमयं जगत् !
आंगिकं भुवनं यस्य |
वाचिकं सर्व वाङमयम् |
आहार्यं चंद्र तारादिम् |
तं नमः सात्त्विकं शिवम् ||
संपूर्ण वैश्विक निर्मितीच एका जाणीवेचे,चैतन्याचे नृत्य आहे.…..आणि ते चैतन्य रुपी नृत्य आपण ज्ञात तसेच अज्ञात विश्वात सर्वत्र अविरत , अखंड सुरूच असते असे मानतो. मग ते ब्रह्मांडातील असंख्य ,अगणित ग्रह , नक्षत्र, तारे यांचे भ्रमण नृत्य असो , पंचमहाभूतातील मूळ तत्त्वाचे असो, निसर्गाचे असो, ऋतूंचे असो, पशुपक्षी , प्राणी यांचे जीवन नृत्य असो... किंवा आपल्या देहातील अणु रेणूं चे असो..... असे हे नृत्य अणू रेणूं पासून ते ब्रम्हांडा पर्यंत व्यापले गेले आहे. त्या जाणीवेला आपल्या भारतीय संस्कृतीत नृत्य कलेचे आद्य दैवत नटराज शिवशंकर यांना मानले आहे .भगवान शिवाचे नृत्य ;नटराजाच्या मूर्तीच्या शिल्पकृती मध्ये असो वा पेंटिंग्ज रुपात असो; पूर्णपणे एकवटले आहे. …. नटराजाची मूर्ती सौंदर्याने परिपूर्ण आहेच पण तिच्यातील गर्भितार्थ हा सूचक आहे, तात्विक आहे. उजव्या हातातील डमरु हे सर्जनाचे, नवनिर्मितीचे प्रतीक आहे, डाव्या हातातील अग्नी हा विनाश दर्शविणारा आहे, आशिर्वाद देणारा हात ईश्वर शक्तीचे अस्तित्व सांगणारा आहे, पायाकडे संकेत करणारा हात स्वकर्तृत्वाने कर्म वादाचा मार्ग दाखवणारा आहे,उजवा पाय मोहमाया अज्ञान ,दोषा रुपी राक्षसाला पायदळी तुडवून गुणांची वृद्धी करण्याचा मार्ग दाखवणारा आहे . नटराजाच्या मूर्ती सभोवार असलेले चक्र संपूर्ण सृष्टीचा लय विलय दर्शवणारे आहे.
अशीही सदाशिव असणारी , मांगल्याने परिपूर्ण असलेली शंकराची नृत्यमय आकृती ‘नटराज’, नृत्य कलेची आराध्य देवता आहे.
नृत्य ही एकमेव कला आहे ज्यामध्ये शिल्प, चित्र, नाट्य, साहित्य, आणि गायन या संपूर्ण ललितकला विविध स्तरांवर विविध तत्त्वे घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे अभिव्यक्त होतात. सर्व ललित कलांचे प्रयोजन एकच आहे ते म्हणजे आत्मविष्कार, सौंदर्य निर्मिती आणि अभिव्यक्ती. एक कलावंत आपल्या कलेद्वारे सर्वसामान्य भाषा व्यवहाराच्या मर्यादेपलीकडे असणाऱ्या खोलवरच्या भावना आणि स्थायीभाव यांना आविष्कृत, अभिव्यक्त करत असतो. कलावंताच्या मनावर दृश्य विश्वातील वस्तूंचा मानवी संस्कृतीचा, मानवी जीवन शैलीचा, निसर्गाचा,,ऐतिहासिक कथांचा विविध धर्माचा भावनात्मक परिणाम होतो. त्यांच्या अंतर्मनात भावगर्भ आकृती प्रदीप्त होते व चित्रकृती निर्मित होते. रंग, अवकाश ,आकार आणि रचना यातून एका अलौकिक अनुभूतीला स्पर्श करण्याचा प्रयत्न चित्रातून प्रतीत होतो.
तसे पाहता चित्रकला या ललित कलेत विविध शैली, विविध विषय आहेत.तंत्र रीती आणि व्यावहारीक उपयोजन यानुसार भित्तिचित्र, लघुचित्र , अलंकृत पट्ट असे प्रकार होतात. त्यातील लघु चित्राचे ( मिनिएचर पेंटिंग्ज )एक वेगळेच सौंदर्य आहे. लघु चित्रकला म्हणजेच मिनिएचर पेंटिंग. मिनिएचर शब्द लॅटिन शब्द मीनियम मधून तयार झाला आहे ज्याचा अर्थ लाल रंगाचा शिसा असा आहे. या रंगाचा उपयोग पुनर्जागरण काळात प्रदीप्त झालेल्या पांडू लिपीत केल्या जायचा. लघु चित्राचा अर्थ आकाराने लहान चित्र मात्र सर्वांगाने परिपूर्ण असते. यामध्ये पूर्ण चित्राचा विचार केला जातो, जसे की प्रत्येक भागाचे तपशीलवार चित्रण त्यातील छोटे-छोटे बारकावे रेखाटले जातात. ओझरत्या दृष्टिक्षेपात मोहक सौंदर्य दिसते तर जवळून निरीक्षण केले तर अभूतपूर्व अनंत गुंतागुंतीच्या भावनांचा उलगडा होतो. अत्यंत नाजूक कलाकौशल्य, आकर्षक गडद रंग, मोहक प्रतिमा, बारकाईने करण्यात आलेले कुठल्याही विषयाचे प्रगटीकरण हे लघु चित्राचे वैशिष्ट्य आहे. इतक्या आधुनिक काळात पण अजूनही खारीच्या केसांचा पेंट ब्रश म्हणून वापर केला जातो. लघु चित्रकलेचे सादरीकरण हे पाम लिफ, संगमरवरी, कागद ,लाकुड, हस्तिदंत पॅनल्स, कापड यावर विशेष करून होतो. नैसर्गिक रंगाचा जसे फुलं, पानं, वनस्पती, खनिज पदार्थ, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, सोने-चांदी यांचा वापर वापर केला जातो.
इसवीसन सोळाव्या- अठराव्या शतकात मोगलांच्या काळात तर लघुचित्राची विशेष भरभराट झाली. राजपूत आणि इराणी शैलीच्या संयोगाने मोगल शैली निर्माण झाली.
मोगल काळातील या लघु चित्रात राजेशाही पणा अत्यंत बारकाईने चित्रित केला आहे. चित्रात आपल्या शाही दरबारातील जनानखान्यात शाही राण्या दरबारी नृत्यकलेचा आनंद घेत असताना दिसतात सोबत वाद्यवृंद मृदंग, तानपुरा. अशी पारंपारिक वाद्य वाजवताना दिसतात. पारंपरिक पोषाखात नर्तकी कला सादर करताना अप्रतिम रित्या रेखाटण्यात आली आहे.
सतराव्या-अठराव्या शतकात राजपूत लघु चित्रकला राजस्थानात विकसित झाली. राजपूत लघु चित्रात कृष्ण जीवन चरित्राचे वर्णन आहे. कलाकार निहाल चंद यांनी अनेक लघु चित्रात कृष्ण लीलां, राधाकृष्ण यांचे निरपेक्ष प्रेम, मैत्री, गोपी भाव, राधा भावअतिशय मोहकपणे व्यक्त केला आहे. जसे राधा कृष्णाचे गोप- गोपिकां सोबतचे रास नृत्य, होळीचे होरी नृत्य... भगवान विष्णु चा नृत्यावतार असलेले नटवर कृष्ण यांच्या लीला तर लघुचित्राचा अत्यंत आवडता विषय असतो.
रास नृत्य |
चित्रातील देखाव्यात तर कृष्ण हा जादुई बासरीचा स्वरनाद करताना गोपीकांनी वेढला गेला आहे आणि प्रत्येक गोपी आपल्या समीप कृष्णाला अनुभवते आहे यावरून राधेला आणि गोपिकांना कृष्णाशिवाय दुसरे जगच नाही असा अनुभव चित्रकाराने मोहक पणे वर्णिला आहे…..
लघु चित्रांची परंपरा राजस्थानच्या वेगवेगळ्या घराण्यांनी जसे बुंदी, किशनगढ, जयपुर, मारवाड येथील कलाकारांनी पुढे नेली. दख्खन मधील राग माला पेंटिंग्ज पण लघुचित्रकलेचा एक प्रकार आहे, ज्यात रागांची शृंखला असते प्रत्येक रागातली एक धून म्हणजे एक व्यक्ती ,व्यक्तीची मनस्थिती दर्शवतो. प्रेम हा राग मालाचा मूळ विषय असतो उत्कट प्रेम, आदर, मैत्री, राग-लोभ, रुसणे ,मनवणे या सर्व छटा राग मालात दिसतात .सहाही ऋतू जसे नायक-नायिकेची ज्याप्रमाणे मनस्थिती ( मूड ) दर्शवतात तसेच हे राग मालातील राग चित्रात रस निर्माण करतात…. राग मेघमाला , राग बसंत लघुचित्रात नृत्यातील पारंपारिक वाद्य जसे मृदंग पखवाज, टाळ, सतार ,वीणा, मंजीरा यांचे वर्णन दिसते.
राग मेघमाला |
राग बसंत |
लघु चित्रात प्रदेश विशिष्ट अशा नृत्यशैली सतत उत्क्रांत होत गेल्या विविध भारतीय अभिजात नृत्यशैली यांचा उदय झाला. भरतनाट्यम, कथकली, कथक मणिपुरी या प्रमुख नृत्यशैली मानल्या जातात. नृत्यशैलीचीकाही खास वैशिष्ट्ये, सौंदर्यस्थळे . लयबद्ध अंग संचालन तालबद्धता, सुसंबद्ध ,सुयोग्य भावाविष्कार या सर्वांना यथोचित वाद्यवृंदाची समर्पक साथ यांच्या संयोग लघु चित्रात अप्रतिमरीत्या वर्णिलेला आहे.
कथक नृत्य |
भरतनाट्यम् नृत्य |
भारतात त्याचबरोबर लोकनृत्याची समृद्ध परंपरा असून प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असे लोक नृत्य प्रकार आहेत. विविध उत्सव, सणांच्या निमित्ताने एकत्रित होऊन आनंद व्यक्त करण्यासाठी मनोरंजनासाठी नृत्याचे सादरीकरण होत असे. प्रत्येक ऋतूतील नृत्याचे महत्व पण आगळे वेगळेच आहे जसे वसंत ऋतू, श्रावण मास.
भरतमुनींच्या नाट्य शास्त्रातील अष्टनायिका मधील अभिसारिका या नायिकेची नायका प्रतीची ओढ असो वा कलहान्तरिता नायिकेचे प्रियकरासाठी चा राग, निरपेक्ष प्रेम सर्व भावना चित्रात साकारण्याचा प्रयत्न लघु चित्रात पुरेपूर जाणवतो.
अभिसारिका |
कलहान्तरिता |
आशियायी संस्कृती इतकेच युरोपियन पाश्चिमात्य संस्कृतीचा आपण लघु चित्रावर प्रभाव जाणवतो. पर्शियन लघु चित्र कला अस्तित्वात तेराव्या शतकात आली आणि त्यावर मग चीन मोगल यांचा प्रभाव पडला. पंधराव्या- सोळाव्या शतकानंतर लघु चित्रावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. एकोणिसाव्या शतकानंतर लघु चित्रावर युरोपीयन इराणी टर्किश संस्कृतीचा पण प्रभाव दिसून येतो..
पर्शियन नृत्य |
बॉलरुम नृत्य, ऑस्ट्रेलियाचे वॉल्टज नृत्य |
अर्जेंटिनाचे टॅंगो नृत्य असो की बॉलरुम नृत्य ऑस्ट्रेलियाचे वाॅल्टज नृत्य असो, रशियाचे बॅले , क्युबाचे सालसा नृत्य असो वा जापान चे काबुकी नृत्य…. प्रेमीयुगुल एकमेकांची साथ करत ,नृत्य करत असतानाचे त्यांचे संवाद, एकमेकांशी जवळीक, त्यांच्या भावना, एकमेकांमध्ये गुंतलेले ,बुडालेले असणे या सर्व भावना अतिशय मोहक रूपात आहेत.
युरोपियन लघु चित्रात छायांकन आणि दृष्टिकोन याचा परिचय होतो.
अर्जेंटिनाचे टॅंगो नृत्य, क्युबाचे सालसा नृत्य |
बॅले |
तर काबुकी नृत्यात युद्ध कथेचे वर्णन , पारंपारिक पोषाख , पारंपारिक वाद्य यांचे वर्णन दिसते.
अशाप्रकारे भारतीय शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, पाश्चिमात्य, युरोपियन ,पूर्व आशियाई येथील नृत्याच्या इतिहासात नृत्याचा विकास प्रसार होण्यासाठी लघु चित्रकला शैलीचे महत्त्वाचे योगदान आहे.
स्वानुभवाची अभिव्यक्ती कलाकार आपल्या कलेतून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.चित्रकला संवेदनाक्षम कला असून कलाकार जाणीवपूर्वक विविध भावनांच्या सूक्ष्मतम छटा व्यक्त करण्याचे सामर्थ्य या कलेत आहे. या विश्वातील कोणत्याही गोष्टीचे सौंदर्य हे त्यातील चैतन्यामुळे टिकून आहे. मानवी देहातचैतन्य जोपर्यंत आहे ते शरीर सुंदर भासते. मानवाने आपल्या स्वावभाविक चलनवलनाला आपल्या कल्पनाशक्तीची जोड देऊन ललित कलांना अनन्यसाधारण असे महत्त्व प्रदान केले आहे . या माध्यमातून त्या ईश्वर रुपी चिंतन माणसाला मोक्षाची प्रेरणा देणारा आहे.
त्या निर्मात्यांसाठी ही संपूर्ण सृष्टीच एक लघुचित्र आहे. अत्यंत बारकाईने या सृष्टीची निर्मिती या निर्मात्याकडून केली गेली आहे . मानवी देह, निसर्ग हे या निर्मितीचे प्रत्यक्ष रूप आहे. या निर्मात्या बद्दल ओढ आणि उत्सुकता आपल्याला कायमच असते पण एका चित्रकारांमध्ये ती सौंदर्यदृष्टी, निरीक्षण क्षमता आणि भावना अभिव्यक्त करण्याची क्षमता नक्कीच असते आणि म्हणूनच तिथे निर्माता आणि निर्मिती एक होऊन जाते.
गतिशील जगातील सर्व बदलणाऱ्या अवस्था आणि प्रवृत्ती यां पलीकडे जाऊन अविनाशी परमोच्च आनंद, गुणवत्ता आणि सामर्थ्य नृत्य आणि चित्रकला या संयोगात असते.
***
Comments
Post a Comment