'पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन' पुस्तक प्रकाशन समारंभ
Swarada Dhekane, Photo courtesy : Tejdipty Pawade |
नृत्य क्षेत्रातील विद्वान आणि साहित्यिक डॉ.पप्पु वेणुगोपाल राव लिखित ‘बंच ऑफ जावळीज्’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद नृत्य कलाकार आणि ब्लॉगर स्वरदा ढेकणे हिने केला आहे. या ‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, २८ जुलै रोजी ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर, शिक्षणतज्ज्ञ अर्चना नेगिनहाल आणि मोहिनीअट्टम् नृत्यांगना डॉ. रेखा राजु यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान स्वतः डॉ. पप्पु वेणुगोपाल राव भूषविणार आहेत. २८ जुलै रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह येथे सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
जावळी म्हणजे दक्षिण भारतात उगम पावलेल्या शास्त्रीय संगीत आणि नृत्यातील नायक-नायिकांवर आधारित पारंपरिक रचनाप्रकारांपैकी एक. १९ व्या शतकात दक्षिणेकडील अनेक राजांनी व कवींनी असंख्य जावळी रचना लिहिल्या. विविध रचनाकारांनी रचलेल्या काही वैविध्यपूर्ण जावळींचा अर्थ, विवेचन आणि पार्श्वभूमी मराठी भाषेत जाणून घेता याव्यात यासाठी स्वरदा ढेकणे हिने हा अनुवाद केला आहे.
या कार्यक्रमात स्वरदा ढेकणे ‘समर्पण’ या भरतनाट्यम् नृत्याद्वारे जावळींचे सादरीकरण करणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रार्थना सदावर्ते आणि श्रावणी सेन करणार आहेत.
वेळ : शनिवार, २८ जुलै, सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रस्ता
Comments
Post a Comment