"कला जीवित राहणे महत्त्वाचे!"

Chhau Dance Performer: Rakesh Sai Babu



पुणे शहराला, येथील कला- रसिकांना ज्यांनी आपल्या सादरीकरणातून सर्वप्रथम छाऊ नृत्याशी ओळख करून दिली, त्या नृत्याचा आनंद दिला, महाभारत, नायक महोत्सवातून कायमच त्यांचे आणि त्यांच्या नृत्यशैलीचे वेगळेपण जाणून आले. आपल्या शैलीविषयी अत्यंत आदर बाळगणारे तसेच ती शिकण्याची आणि शिकवण्याची तसेच जास्तीतजास्त  ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची मेहनत आणि आवड त्यांच्या बोलण्यातून आणि नृत्यातून दिसून येते, असे दिल्लीचे सुप्रसिद्ध 'छाऊ' नर्तक श्री. राकेश साई बाबू  यांच्याशी 'संवाद'तर्फे नुकत्याच साधलेल्या संवादातून मिळालेले काही विचार तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न!



तुम्ही छाऊ ह्या नृत्यप्रकाराकडे कसे वळलात?
खरंतर छाऊ ही आमची घरातील परंपरा आहे, कौटुंबिक वारसा आहे. मी प्रथम ह्या नृत्याकडे गंभीरतेने पाहिले नव्हते. आम्हाला घराण्याचा वारसा आहे, त्यातला मी म्हणजे ५ वी पिढी, पण तरीही हे नृत्य शिकण्याचे बंधन नव्हते. आम्ही लहान असताना इतर मुलांप्रमाणेच खेळणं, अभ्यास करायचो पण कधी कधी असेही होते कि छंद म्हणून करत असलेली एखादी गोष्ट आपण करिअर म्हणून निवडतो, हे आपल्यालासुद्धा लक्षात येत नाही. वयाच्या १६ वर्षी पासून छंद म्हणून शिकायला सुरुवात केली आणि शिकता शिकता आता मी ह्या क्षेत्रात व्यावसायिक बनलो आहे आणि आज आम्ही शिकतो पण आणि शिकवतोसुद्धा, रंगमंचावर सादर करतो. अशाप्रकारे ते छंदकडून व्यावसायिक बनलं. ठिकठिकाणी सादरीकरण करत असताना खूप अनुभव मिळाले, त्यातूनच शिकत आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. 


छाऊ नृत्याचे प्रशिक्षण तुम्ही कोणाकडून घेतले?
आमच्या घरातच ह्या नृत्याचा वारसा असल्यामुळे माझे वडील श्री. जन्मे जोय साई बाबू, उत्तर भारतात ते मयूरभंज  छाऊ नृत्यासाठीचे ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांनी ह्या नृत्याला खूप पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांच्याकडून मी ह्या नृत्याचे शिक्षण घेतले.

ह्या शैलीसाठी कोणत्या प्रकारची मूलभूत तयारी किंवा प्रशिक्षण असते?
कोणतेही नृत्य सुरु करण्याआधी त्यांचे विशिष्ट असे व्यायाम प्रकार असतात. तुम्हाला एक विशिष्ट काळ हे व्यायाम करावे लागतात, जसे कि हस्तमुद्रा, नेत्रमुद्रा, हावभाव, आंगिक अभिनय यांचा सराव इत्यादी. ह्या नृत्यासाठी आंगिक अभिनयासाठी खूप सारे व्यायाम प्रकार असतात. ते जेव्हा संपूर्णतया यायला लागतात तेव्हा मग तुम्ही नृत्य करण्यास तयार होता. त्यात प्राविण्य येते. मग सर्व प्रकारच्या मुद्रा, अभिनय शिकवला जातो. 

हे नृत्य मुले जास्त प्रमाणात शिकतात कि मुली?
नाही. आता मुले-मुली दोन्हींची संख्या समान आहे. पूर्वी मात्र मुलांचीच संख्या जास्त होती, कारण ते नृत्य मुलांचे आहे असा दृष्टीकोन होता. पण माझ्या अनुभवावरून दिल्लीत आज मात्र दोघेही सम प्रमाणात शिकत आहेत. दिल्लीप्रमाणेच आता ओरिसामध्येही हळूहळू अशीच संख्या वाढताना दिसत आहे., तिथेही मुली आता शिकायला लागल्या आहेत आणि ही खूप सकारात्मक गोष्ट आहे कि- बदल घडत आहे.

नृत्त आणि नृत्य ह्या संकल्पनांवर आधारित छाऊच्या रचना कशा असतात?
इतर शैलींमध्ये जशी सुरुवातीला वंदना असते तशी छाऊमध्ये ‘स्थायी’ असते, त्यानंतर ‘मध्यम’ म्हणजेच नृत्य त्यात येतं आणि शेवटी जसा भरतनाट्यममध्ये तिल्लाना करतात तसे छाऊमध्ये ‘रेला’ ही रचना असते, जी द्रुत लयीत केली जाते. सर्व नृत्य रचना ह्या कथेवर आधारित असतात, तरीही तालबद्ध असतात. कथेची सुरुवात, मध्य आणि शेवट हे आम्ही आमच्या हालचालींच्या द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे एक आव्हानच असतं कि साहित्याशिवाय शारीरिक हालचालींतून कथा मांडणे. अभिनयासाठी शब्दांची गरज पडतेच असे नाही. पारंपारिक रचना ह्या तालावरच्या/संगीतावरच्याच आहेत. त्यामुळे कथा ही त्या संगीतावर आम्ही सादर करतो. उदाहरणार्थ, नटराजाची कथा- उत्पत्ती, रक्षण आणि विनाश अशा तीन भागात कथा त्या संगीतावर मांडतो. साहित्याचा वापरही केला जातो अशा काही रचना सापडतात पण मोठया प्रमाणावर संगीतमयच(rhythmic) आहे. आणि हे ह्या शैलीचे वैशिष्टय आहे कि नृत्यातून अशाप्रकारे पोहोचवणे अथवा अभिव्यक्त होणे. हिंदुस्तानी संगीताला लोकनृत्याशी कसे जोडता येईल आणि रचना बनवल्या गेल्या असतील, बनवता येतील, ह्यावर विचार केला जातो. ताल पद्धतीसुद्धा ६ मात्रांनी सुरुवात होऊन ८,१२,१६, २४, ३६ ह्या मात्रांवर आधारित असतात.

प्रोप्सचा(props) वापर करण्यामागचे नेमके उद्दिष्ट काय?
ते पण पुन्हा कथेवर आधारित नृत्यात वापरलं जातं. कथेतील पात्रांप्रमाणे त्या त्या वस्तूचा वापर होतो. जसे कि, एखादा ब्राह्मण ब्रह्मचारी जो भिक्षा मागतो, त्याच्या हातात कमंडलू, पोटली असते. जे घरोघरी जाऊन भिक्षा मागतात. त्यांचे जीवन कसे असते? त्यावर आधारित ती कथा सादर केली जाते, स्थायी, मध्य आणि द्रुतमध्ये. स्थायीमध्ये- तो कसा घर सोडून जातो, तेव्हाचे भाव, मध्यमध्ये- त्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, त्याला येणाऱ्या अडचणी, त्यातून जगण्याचा प्रयत्न, आणि शेवटी द्रुत (रेला) मध्ये त्या जीवनाचा स्वीकार. अशाप्रकारे एखादी कथा खुलत जाते. अशा रचनांना ‘दांडी’ असे म्हणतात. ‘योद्धा’वरील कथाही सादर होतात. एखादा सैनिक/युद्ध करणारा स्वतःला कसा तयार करतो युद्धासाठी अशी वीर रसयुक्त रचना असते. ‘शिकारी’ नृत्य पण असते- शिकार करणारा जेव्हा जंगलात जातो तेव्हा तो काय काय करतो यावर आधारित एखादे कथानक असते. एकूणच, विषयांचे स्वातंत्र्य आहे. ह्या सर्व रचना पारंपारिक आहेत.

इतर शास्त्रीय नृत्यांबरोबर छाऊचे सादरीकरण करण्याचा तुमचा अनुभव कसा आहे?
खरंतर, प्रत्येकाला आपल्या पद्धतीने सादरीकरण करता येते. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आपल्या नृत्यातून साकार करतो. आणि मी काम केलेल्या ‘महाभारत’ प्रोजेक्टचे हेच वैशिष्टय आहे कि ७ ही शैली आपली ओळख निर्माण करतात. कारण शेवटी प्रेक्षकांना समजणे आवश्यक आहे, त्यांच्या पर्यंत पोहोचणे महत्त्वाचे. 

तुम्हाला युवा पिढीला एक छाऊ नर्तक म्हणून काय सांगावेसे वाटते?
जे काही तुम्ही शिकाल त्याचा आनंद घ्या. तुम्ही जर काही वेगळं शिकत असाल, करत असाल तर तो तुमचा '+ पोइंट' आहे. तुम्ही शिकून ते इतरांपर्यंत जर पोहोचवलं तर आपल्या कला ह्या जीवित राहतीलआणि हेच खूप महत्वाचे!

- श्री. राकेश साई बाबू 
- मुलाखतकार: स्वरदा.



"नृत्ययात्री", पुणे तर्फे फेब्रुवारी २०१६ मध्ये नुकत्याच झालेल्या राकेश साई बाबूंच्या कार्यशाळेचे काही दृश्यात्मक अनुभव:
- Videography: Swarada.





Rakesh Saibabu, a Mayurbhanj Chhau dancer based in New Delhi. Born to a Royal Ancestory of Renowned Mayurbhanj Chhau performers, the grandson of "SANGEET NATAK AWARDED GURU ANANT CHARAN SAIBABU", he got the privilege to learn the art from his father the renowned Chhau Guru/Exponent Guru Janme Joy Saibabu. He has been carrying forward the legacy of this traditional dance form throughout the years.
Chhau is a glorious heritage of Mayurbhanj, a state in Orrisa, East India. With elements of folk, tribal, martial, traditional classical art. Beautiful yet virile dance form, known of nature's beauty.The visual poetry is the name of Mayurbhanj Chhau. Set in a style that is free, intense, stormy dynamic yet lyrical.
Gurukul Chhau Dance Sangam, a Registered Society Under the Societies Registration Act from New Delhi to perform at the Kendra.
Our teaching center and performing group is directed by Guru, Janmejoy Sai Babu. 
It is composed by TEN permanent dancers, national and foreign, professionals in different forms of dance both classical and modern, and with different artistic backgrounds, learning the style of Mayurbhanj Chhau under the guidance of Guruji and his sons Shri Rajesh Sai Babu and Rakesh Sai Babu, who have performed extensively in various dance festivals and shows all over India, 
and in different countries abroad as well.
i.e. USA ,Germany, Austria, Switzerland, Hongkong,Shanghai , South Africa, Indonesia, Sri Lanka , Spain , Glassgow, Ghana , Kajakistan, barcelona, malaysia , Bangladesh , london etc To name a few.
The fame of Mayurbhanj Chhau has crossed geographical limitations and has claimed world wide fans for its beauty, vigor and marvel of the art.
In recent times, Mayurbhanj Chhau has become popular as a medium of choreography, with its wide range of postures and movements that adapt well to modern as well as traditional treatment.






























Comments

  1. Great work swarada. Keep it up. Every article added to ur blog becomes more informative.

    ReplyDelete
  2. Great work swarada. Keep it up. Every article added to ur blog becomes more informative.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts