लघुचित्रातील नृत्य (Dance in Miniature paintings)
निबंध लेखन: किर्ती पाठक Essay written by: Kirti Pathak ( 1st winner of NrutyaShabda Dance Essay Writing Competition, 2020 Senior Group, Organized by Samvaad Performing Arts Blog - Swarada Dhekane & Loud Applause Dance E-Magazine - Neha Muthiyan) नृत्यमयं जगत् ! आंगिकं भुवनं यस्य | वाचिकं सर्व वाङमयम् | आहार्यं चंद्र तारादिम् | तं नमः सात्त्विकं शिवम् || संपूर्ण वैश्विक निर्मितीच एका जाणीवेचे,चैतन्याचे नृत्य आहे.…..आणि ते चैतन्य रुपी नृत्य आपण ज्ञात तसेच अज्ञात विश्वात सर्वत्र अविरत , अखंड सुरूच असते असे मानतो. मग ते ब्रह्मांडातील असंख्य ,अगणित ग्रह , नक्षत्र, तारे यांचे भ्रमण नृत्य असो , पंचमहाभूतातील मूळ तत्त्वाचे असो, निसर्गाचे असो, ऋतूंचे असो, पशुपक्षी , प्राणी यांचे जीवन नृत्य असो... किंवा आपल्या देहातील अणु रेणूं चे असो..... असे हे नृत्य अणू रेणूं पासून ते ब्रम्हांडा पर्यंत व्यापले गेले आहे. त्या जाणीवेला आपल्या भारतीय संस्कृतीत नृत्य कलेचे आद्य दैवत नटराज शिवशंकर यांना मानले आहे .भगवान शिवाचे नृत्य ;नटराजाच्या मूर्तीच्या शिल्पकृती मध्ये असो वा पेंटिंग्ज रुपात असो; पूर